VIDEO | आशिष शेलारांनी राऊतांवर निशाणा साधत मांडली भाजपची बाजू

VIDEO | आशिष शेलारांनी राऊतांवर निशाणा साधत मांडली भाजपची बाजू

मुंबई : विधीमंडळ नेतेपदावरुन अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली हकालपट्टी अयोग्य आहे असं भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.  तर त्यांच्या जागी जयंत पाटील यांची केलेली निवड ही अवैध आहे असंही शेलार यांनी म्हटलं आहे. जर नव्या विधीमंडळ नेत्याची निवड करायची असेल तर सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र सादर करावं लागतं. तसंच ते राज्यपालांना द्यावं लागतं.. असं कोणतंही पत्र राज्यपालांना देण्यात आलेलं नाही त्यामुळे अजित पवारांची हकालपट्टी अयोग्य आणि जयंत पाटील यांची नियुक्ती अवैध ठरते असं शेलार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम राष्ट्रवादी करतंय असा टोला त्यांनी लगावलाय.  

 राज्यपालांनी आम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आम्ही 170 आमदारांच्या जिवावर बहुमत सिद्ध करू. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो येईल तो येईल. आम्ही सकाळी सहा वाजता संघाच्या शाखेत जाणारे स्वयंसेवक आहेत. सकाळी सहाची राम प्रहराची वेळ असते, ती त्यांना काळोख वाटत आहे. राम प्रहरी आम्ही केलेले सत्कर्म आहे. त्यामुळे आम्हाला संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये, असा आमचा त्यांना सल्ला आहे, अशी जोरदार टीका भाजप नेते आशीष शेलार यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी आज (रविवार) सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने अजित पवारांना साथीला घेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. शेलार यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच त्यांनी 30 नोव्हेंबरला आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू असा दावाही केला आहे.

शेलार म्हणाले, की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सकारात्मक सरकार आले आहे. आम्ही जनतेमध्ये फिरणारे कार्यकर्ते आहोत. जमेल भाषेत बोलायला मी संजय राऊत नाही. संजय राऊत सत्तेसाठी हापापलेले आहेत. राऊतांसारख्या भाषेला भाजपला स्थान नाही. दिल्लीत सोनिया गांधींशी केलेली सलगी हा गोराबाजार आणि आम्ही अजित पवारांसोबत गेलो तो काळाबाजार का? आणीबाणीबाबत शिवसेनेने आपली भूमिका बदलल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. 

Web Title: BJP leader Ashish Shelar talked about sanjay raut and ncp

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com